Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Indian Railways: Divided By Zones, United By Railfans - Karthik

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Mon Jun 14 20:32:20 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Advanced Search

News Posts by ⚫

Page#    Showing 1 to 5 of 604 news entries  next>>
Jul 09 2019 (23:20) दौंड रेल्वेला साखर वाहतुकीतून १३ कोटी २३ लाखांचे उत्पन्न (www.esakal.com)
IR Affairs
CR/Central
0 Followers
13360 views

News Entry# 386303  Blog Entry# 4373792   
  Past Edits
Jul 09 2019 (23:20)
Station Tag: Daund Junction/DD added by ✒^~/1269766
Stations:  Daund Junction/DD  
दौंड( पुणे) : दौंड रेल्वे स्थानकास ४७८३० टन साखरेच्या वाहतुकीतून सव्वादोन महिन्यात तब्बल १३ कोटी २३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दौंड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सॅम्यूएल क्लिफ्टन यांनी या बाबत माहिती दिली. 
पुणे व नगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून उत्पादित साखर दौंड रेल्वे स्थानकावरून उत्तर व पूर्व भारतातील विविध रेल्वे स्थानकांवर पाठविली जाते. तेथून ही साखर नेपाळ व भूतान येथे निर्यात केली जाते. रेल्वे मालवाहतुकीच्या एका रेक मध्ये सरासरी ४० ते ४२ वॅगन असतात व एका रेकच्या भाड्यापोटी रेल्वेला अंतरानुसार सुमारे ७५ लाख रूपये मिळतात. परंतु हे रेक सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. दौंड रेल्वे प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यानंतर सोलापूर विभागाचे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा व सहायक व्यवस्थापक व्ही. के. नागर यांनी रेक उपलब्ध करून दिल्याने मोठ्या प्रमाणावर दौंड येथून साखरेची वाहतूक वाढली आहे.
...
more...
१ मे २०१९ ते ९ जुलै २०१९ पर्यंत एकूण ४७८३० टन साखरेची वाहतूक करण्यात आली. १८ रेकच्या एकूण ७५६ वॅगन मधून ही वाहतूक करण्यात आली.               दौंड येथे रेल्वे उड्डाणपुलाजवळ मालधक्का असून तेथे हमाल, वाहतूकदार, सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठीच्या मूलभूत सुविधांची वाणवा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. 
दौंड स्थानकाच्या उत्पन्नात भरीव वाढदौंड रेल्वे स्थानकास प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, लांब पल्ल्यांचे तिकिटआरक्षण, दंड, आदींद्वारे सरासरी महिन्याला एकूण तीन ते साडेतीन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते. परंतु मे व जून २०१९ मधील साखरेच्या वाढलेल्या वाहतुकीमुळे एकूण उत्पन्नात भरीव वाढ आहे. 
दौंड रेल्वे स्थानकास मिळालेले एकूण उत्पन्न पुढीलप्रमाणे (कोटी रूपये) : डिसेंबर २०१८ - ३. १ ,जानेवारी २०१९ - ४. ६, फेब्रुवारी - ३.४४, मार्च - ३.३३, एप्रिल - ३. ३९, मे - ९. ६४, जून - ७.९९.
स्थानकाच्या एकूण उत्पन्नाच्या आधारे प्रवासी व मालवाहतूकदारांना सुविधा दिल्या जात असल्याने आगामी काळात दौंड मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहे. 
Jul 02 2019 (07:06) मुंबईची लोकलसेवा ठप्प, पावसाने उडवली दाणादाण (www.google.com)
Major Accidents/Disruptions
ML/Mumbai Local
0 Followers
29167 views

News Entry# 385744  Blog Entry# 4362721   
  Past Edits
Jul 02 2019 (07:09)
Station Tag: Kurla Junction/CLA added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:09)
Station Tag: Sion/SIN added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:08)
Station Tag: Mulund/MLND added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:08)
Station Tag: Matunga/MTN added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:08)
Station Tag: Dadar Central/DR added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:08)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:08)
Station Tag: Dombivli/DI added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:08)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:08)
Station Tag: Thane/TNA added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:08)
Station Tag: Vasai Road/BSR added by ✒^~/1269766

Jul 02 2019 (07:08)
Station Tag: Nalla Sopara/NSP added by ✒^~/1269766
रात्रभर झालेल्या पावसामुळे लोकल सेवा कोलमडली
लोकसत्ता ऑनलाइन | July 2, 2019 06:39 am
सरकारने जाहीर केली सुट्टी
मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते मात्र मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसामुळे या लोकल सेवेचे तीन तेरा वाजवले आहेत. आज पहाटेपासूनच लोकल सेवा बंद असल्याच्या घोषणा विविध स्टेशनवर केल्या जात आहेत. डोंबिवली ते ठाणे हे स्लो लोकलने वीस मिनिटात कापले जाणारे अंतर कापण्यासाठी दीड ते
...
more...
दोन तास लागत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल्स ठाण्यापर्यंत मुंगीच्या गतीने जात असून त्यापुढे पुढील सूचना मिळेपर्यंत लोकलसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईतल्या लोकलसेवेला पावसाने ब्रेक लावला आहे.
School closed, hospital, railway staion water-logged as rain lashes Mumbai
Read @ANI story | click here pic.twitter.com/9TsYOrexeM
— ANI Digital (@ani_digital) July 1, 2019
डोंबिवली स्टेशन या ठिकाणी घोषणा दिल्या जात होत्या ज्यामध्ये मुंबईच्या दिशेने म्हणजेच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल गाड्या ठाण्यापर्यंतच चालवण्यात येत आहेत असे सांगितले जात होते. पुढील सूचना मिळेपर्यंत ही लोकलसेवा स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात येत होते. सायन, कुर्ला आणि माटुंगा परिसरात रूळांवर पाणी साठल्याने आणि मुंबईत रात्रभर पाऊस पडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेतर्फे घोषित करण्यात आले. दरम्यान शाळा कॉलेजसनाही सुट्टी देण्यात आल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठण्यासही सुरूवात झाली आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावरही अशीच काहीशी स्थिती आहे. नालासोपारा आणि वसई या भागात प्रचंड पाऊस पडतो आहे. तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्येही पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या सेवेवरही झाला आहे. इतकंच नाही तर हार्बर रेल्वे मार्गावरही पावसाचा परिणाम झाला आहे. काल उशिराच्या शिफ्टमध्ये काम करून घरी परतणाऱ्यांना आणि आज सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी घर सोडलेल्या सगळ्यांनाच लोकल सेवा विस्कळीत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पावसाळा सुरू होण्याआधी नालेसफाई झाली, यंदा मुंबईची तुंबई होणार नाही असे दावे केले जातात. मात्र मुंबईत अशी वेळ येतेच की ज्यामुळे तिचा वेग मंदावतो. गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिली. त्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे प्रचंड पाऊस झाल्याने लोकलसेवा ठप्प झाली आहे.
First Published on July 2, 2019 6:39 am
Jul 01 2019 (20:40) मुंबई: दिवसभरात लोकलच्या १८३ फेऱ्या रद्द (m.maharashtratimes.com)
Major Accidents/Disruptions
ML/Mumbai Local
0 Followers
11375 views

News Entry# 385738  Blog Entry# 4362014   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
मुंबईत मुसळधार पावसाचा मोठा फटका उपनगरीय लोकलसेवेला बसला असून आज सकाळपासून कोलमडलेलं लोकलचं वेळापत्रक अजूनही 'रुळावर' आलेलं नाही. तिन्ही मार्गांवर गाड्या उशिराने धावत असून प्रवाशी रखडपट्टीमुळे पुरते हैराण झाले आहेत. ताज्या माहितीनुसार तिन्ही मार्गांवर २५ ते ३० मिनिटं उशिराने गाड्या धावत आहेत.
Jul 01 2019 (20:30) वर्षभरात 15 रेल्वे फाटक होणार बंद (www.esakal.com)
IR Affairs
SECR/South East Central
0 Followers
12107 views

News Entry# 385737  Blog Entry# 4361967   
  Past Edits
Jul 01 2019 (20:30)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by ✒^~/1269766
Stations:  Nagpur Junction/NGP  
नागपूर : देशभरातील दीड हजार रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. याअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनमधील 54 फाटक बंद केले जाणार आहेत. त्यात नागपूर विभागातील 15 फाटकांचा समावेश आहे.
नागपूर : देशभरातील दीड हजार रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. याअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनमधील 54 फाटक बंद केले जाणार आहेत. त्यात नागपूर विभागातील 15 फाटकांचा समावेश आहे.देशात होणाऱ्या एकूण रेल्वे अपघातांपैकी 40 टक्के अपघात रेल्वे फाटकांवर होतात. ही बाब लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने देशभरातील ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे फाटकांचा प्रश्‍न निकाली काढला. ब्रॉडगेज मार्गावर एकही मानवरहित रेल्वे क्रॉसिंग शिल्लक नाही. यापाठोपाठ रेल्वे कर्मचारी नियुक्त असणारे रेल्वे फाटकसुद्धा पर्यायी व्यवस्था निर्माण करून बंद केले जात आहेत. या उपाययोजनेमुळे अपघातांना आळा बसेल. सोबतच
...
more...
रेल्वे वाहतूक गतिमान होण्यासह हातभार लागणार आहे.देशात गतवर्षी एक हजार 477 ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरब्रिज उभारले. चालू वर्षात दीड हजार पुलांच्या निर्मितीचे लक्ष्य आहे. त्यातील 195 पुलांची कामे यापूर्वीच पूर्ण झाली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत असलेले 19 रेल्वे फाटक गत वर्षीपासून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आले. त्यातील दहा ठिकाणी उड्डाणपूल, अंडरब्रीज किंवा सबवे तयार केले आहेत. दपूमरे नागपूर विभागातील 15 फाटकांसह बिलासपूर विभागातील 30, रायपूर विभागातील नऊ असे एकूण 54 रेल्वे फाटक चालू वर्षात बंद करण्याचे नियोजन केले आहे. या सर्व ठिकाणी 173 कोटींच्या खर्चातून पर्यायी व्यवस्थेची उभारणी केली जाणार आहे. मुंबई मुख्य मार्गावरील सर्व 193 रेल्वे फाटक पुढील चार वर्षांमध्ये पर्यायी उपाययोजनेसह बंद करण्याचे नियोजन केले आहे.
Jul 01 2019 (08:20) मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द (www.google.com)
Major Accidents/Disruptions
CR/Central
0 Followers
41381 views

News Entry# 385712  Blog Entry# 4358537   
  Past Edits
Jul 01 2019 (08:20)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by ✒^~/1269766

Jul 01 2019 (08:20)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

Jul 01 2019 (08:20)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by ✒^~/1269766

Jul 01 2019 (08:20)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766

Jul 01 2019 (08:20)
Station Tag: Karjat Junction/KJT added by ✒^~/1269766

Jul 01 2019 (08:20)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Jul 01 2019 (08:20)
Station Tag: Jambrung Cabin/JBC added by ✒^~/1269766

Jul 01 2019 (08:20)
Station Tag: Thakurvadi Cabin/TKW added by ✒^~/1269766
ऑनलाइन लोकमत on Mon, July 01, 2019 7:46am
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी विस्कळीत झाली आहे. कर्जत-लोणावळा सेक्शनमधील घाटामध्ये मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई
मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द
By
...
more...
ऑनलाइन लोकमत on Mon, July 01, 2019 7:46am
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी विस्कळीत झाली आहे. कर्जत-लोणावळा सेक्शनमधील घाटामध्ये मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे.

Open in App
मुंबई/पुणे - मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी (1 जुलै) विस्कळीत झाली आहे. कर्जत-लोणावळा सेक्शनमधील घाटामध्ये मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. याचा रेल्वे सेवेला फटका बसला असून अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. कर्जतजवळील घाट परिसरातील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान पहाटे 4.30 च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल-पुणे पॅसेंजर, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत.
22105 12127 11007 51317 11026 11025 51318 17614 19315
{{{{twitter_post_id####
CPRO,Central Railway: A goods train derailed between Jambrung&Thakurwadi on down line infringing middle line also. Inter city trains leaving Mumbai for Pune (down direction) today morning have been cancelled&long distance trains from Mumbai via Pune will be diverted via Igatpuri. pic.twitter.com/2IQsF4VYbT
— ANI (@ANI) July 1, 2019
}}}}
भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली आहे. तसेच हुजूर साहिब एक्स्प्रेस पनवेलला न जाता पुण्यात येथे थांबवण्यात आली आहे. हमसफर एक्स्प्रेस देखील पनवेलमध्ये थांबल्याची माहिती मिळत आहे. मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबई-पुणे दरम्यान अधिक बस चालवण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारला केली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.
{{{{twitter_post_id####
A goods train derailed in ghat section on Karjat-Lonavala section. Mumbai-Pune train services are affected. Further details will be updated. pic.twitter.com/A7A5SUzfp7
— Central Railway (@Central_Railway) July 1, 2019
}}}}
Page#    604 news entries  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy