🖕right?😁
.
पुणे-हैदराबाद एक्स्प्रेस ही आठवड्यातील तीन वेळा धावणारी गाडी येत्या सहा जुलैपर्यंत कुर्डूवाडी ते हैदराबाद अशी धावेल. ही गाडी सोमवार आणि बुधवारी पुण्याहूनच हैदराबादसाठी रवाना होईल; तसेच हैदराबाद-पुणे ही गाडी कुर्डूवाडीपर्यंतच धावेल. मंगळवारी आणि शुक्रवारीच ही गाडी हैदराबाद-पुणे या मार्गावर धावेल, अशी माहिती मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाने कळविली आहे
उरुळी कांचन येथील श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने पुणे-दौंड मार्गांवरील आठ गाड्यांना...
more... उरुळी स्थानकाचा थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन, तिकीट आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. वास्को- हजरत निजामुद्दीन- वास्को गोवा एक्स्प्रेस २७ मे ते पाच जून या कालावधीत उरुळीला थांबणार आहे. याबरोबरच पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस ३० मे ते तीन जून, पुणे- लखनौ- पुणे एक्स्प्रेसला चार जूनला, निजामुद्दीन-म्हैसूर स्वर्णजयंती एक्स्प्रेस २८ मे रोजी, यशवंतपूर-चंडीगड संपर्क क्रांती एक्स्प्रेसला दोन आणि सहा जूनला, चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेसला २९ मे, यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेसला पाच जून आणि सात जूनला उरुळी स्थानकाचा थांबा देण्यात आला आहे.
कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द
धौलपूर-झांसी या रेल्वे मार्गावर मध्य प्रदेशातील रायरू स्थानक येथे तांत्रिक कामासाठी २१ आणि २८ मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे २३ मे रोजी कोल्हापूरहून सुटणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस (१२१४७) आणि ३० मे रोजी निजामुद्दीनहून सुटणारी कोल्हापूर एक्स्प्रेस (१२१४८) रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने कळवली.