चार महिन्यांपूर्वी होम प्लॅटफॉर्म सोडून प्लॅटफॉर्म क्र. ६वर गेलेली दुरांतो एक्स्प्रेस आता १ ऑक्टोबरपासून पुन्हा होम प्लॅटफॉर्मवर परतणार आहे. नागपूर स्थानकावर होम प्लॅटफॉर्म झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवरून १२२९०- १२२८९ नागपूर- मुंबई- नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ही एकमेव गाडी सुटत होती. मात्र, या प्लॅटफॉर्मवर छत नसल्याने चार महिन्यांतच ही गाडी प्लॅटफॉर्म क्र. ६वर हलविण्यात आली होती. कारण छत नसल्याने प्रवाशांना पावसात ओले होत गाडीपर्यंत जावे लागत होते. आता पावसाळा संपल्याने ही गाडी पुन्हा होमवर परतली आहे.
सात प्लॅटफॉर्म असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावर होम प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने आठव्याची भर पडली होती. 'कार टू कोच' सुविधा असलेला मध्य भारतातील पहिलाच प्लॅटफॉर्म म्हणून रेल्वेने काम पूर्ण होण्याआधीच या प्लॅटफॉर्मचे उद्घाटनही करून टाकले आणि दुरंतो ही गाडी तेथून सुरू केली. मात्र पावसाळ्यात होणारी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन शेवटी १५ जून...
more... ते ३० सप्टेंबर या कालावधीत दुरंतोला प्लॅटफॉर्म सहावर नेण्यात आले. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात बृजेश दीक्षित डीआरएम असताना तब्बल नऊ कोटी रुपये खर्च करून त्यांनी होम प्लॅटफॉर्मची निर्मिती केली होती. कारने किंवा दुचाकीने प्रवाशांना थेट प्लॅटफॉर्मपर्यंत जाता येते, ही या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये आहेत. बाकीच्या प्लॅटफॉर्मवर जसे पूर्ण छत आहे, तसे होम प्लॅटफॉर्मवर नाही.
त्यामुळे पावसाळ्यात कारमधून कोचमध्ये जाताना ओले होत जाण्याची वेळ प्रवाशांवर येणार होती. शेवटी प्रवाशांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा पावसाळ्यात मध्य भारतातील हा वैशिष्ट्यपूर्ण प्लॅटफॉर्म बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता.
/news/post/196253