Best But Bring Express Stop Here For Jath Taluka.जत तालुक्यात असलेल एकमेव जत राेड रेल्वे स्टेशनला एक्सप्रेसचा आणि लांब पल्याच्या रेल्वेचा थांबा दिलाच पाहिजे. जत शहरा पेक्षा ढालगाव (ता-क.मंहाकाळ)आणि क.महाकाळ ही गावे विकासाने मोठी आहेत अशी माहिती रेल्वेकडे आहे की काय ? .....रेल्वेमधील या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्याकडून नेहमीच चर्चा होत असते की जत तालुक्याचे ठिकाण आहे तरी सुद्धा जतराेड रेल्वेस्टेशन येथे एक्सप्रेसचा थांबा का नाही ?...... अश्या मोठ्या नामुश्कीची वेळ जत तालुक्यावर आली आहे ...हा तर जत तालुक्यावरचा अन्याय आहे ....कवठेमंहाकाळ तालुक्यात कवठेमंहाकाळ व ढालगाव दोन्हीही रेल्वेस्टेशनला लांब पल्याच्या रेल्वेचा एक्सप्रेसचा थांबा दिलेला आहे ते केवळ तेथील जागरूक लोकप्रतिनिधीमुळेच.........पण जत तालुक्यात असलेल एकमेव जतराेड रेल्वेस्टेशनला लांब पल्याच्या रेल्वे एक्सप्रेसचा थांबा दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. .....मग आपल्या तालुक्यांच्या वाटा कवठेमंहाकाळ तालुक्यात गेला की आपले लोकप्रतिनिधी कमी पडले हा संशोधनाचा विषय आहे.....रेल्वे प्रशासन म्हणते 40-50 कि.मी.अंतरानंतरच थांबा देता येतो मग कवठेमंहाकाळ व ढालगाव दोन्हीही रेल्वेस्टेशन मधले अंतर 16 कि.मी आहे.
...अजूनही एक...
more... उदाहरण द्यायचे झाल्यास किर्लोस्करवाडी आणि ताकारी मधील अंतर फक्त 8 कि.मी.अंतर आहे पण दोन्ही रेल्वेस्टशवर 15 ते 16 एक्सप्रेस रेल्वेना थांबा दिलेला आहे .फक्त तेथिल वजदार लोकप्रतिनीधीचे नेतृत्व आहे म्हणूनच. .....
...जतराेड रेल्वेस्टेशनला लांब पल्याच्या रेल्वे एक्सप्रेसचा थांबा झाल्यास येथुन पुणे,मुबंई,हैद्राबाद,साेलापुर,काेल्हापूर,नागपुर,सह यशवंतपुर म्हणजेच बेंगलोर येथे जाण्यायेण्याची .............. .....जत शहरा सह....... शेगाव,बनाळी,सिगनहळ्ळी,वाळेखिंडी,काशिंलीगवाडी,बागलवाडी,नवालवाडी,बेवनुर व या परिसरातील प्रवाशांची उत्तम सोय होईल..... त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी जत आगाराकडून जत ते जतराेड रेल्वेस्टेशन बससेवा ....किंवा ....जत ते सांगाेला असलेली बससेवा व्हाया जतराेड रेल्वेस्टेशन मार्गाने करावी अशीही मागणी यापरिसरातून होत आहे...आमदार विलासराव जगताप व खासदार संजय काका पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करावा. याबाबत लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करता येईल. ..तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्नांवर आपले परखड मत व्यक्त करून..शेअर करावे... त्याचबरोबर
...सर्वानीच आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्येच नोंदवा ही विनंती.
याबाबत आपली मते महत्त्वाची आहेत. कृपा करून ती मांडावीत.अंतर 1)जत ते कवठेमंहाकाळ रेल्वेस्टेशन--33 km.2)जत ते ढालगाव(ता-क.मंहाकाळ)रेल्वेस्टेशन-29 km. 3)जत ते जतराेड रेल्वेस्टेशन -23 km.