Gooooooood
#News for MUMBAIKAR
मुंबई: मेट्रोची वाट पाहता पाहता आता मोनोरेलला मुहूर्त सापडला आहे. 26 जानेवारीपासून चेंबूर ते वडाळादरम्यान मोनोरेल्वे धावेल, अशी माहिती एमएमआरडीएकडून मिळाली आहे. सेफ्टी सिक्युरिटी ऍथॉरिटी 13 जानेवारी रोजी मोनो प्रकल्पाला भेट देऊन मोनोरेलच्या मार्गाची अंतिम सुरक्षा चाचणी घेणार आहेत.चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील मार्गाचं काम आणि सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या असूनही फक्त सुरक्षा प्रमाणपत्रासाठी मोनो यार्डातच रखडली होती. मात्र निवडणूक जवळ आल्याने आता सरकार मेट्रो नाही तर किमान मोनोने तरी मुंबईकरांना समाधनी करण्याच्या प्रयत्नात आहे.त्यामुळे दीड वर्ष आधी मुंबईकरांच्या सेवेत उतरणाऱ्या मोनोरेलसाठी 26 जानेवारीचा मुहूर्त साधण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न सुरु आहे.