बाराभाटी रेल्वेस्थानकावरील अंधाराचे साम्राज्य केव्हा दूर होणार
प्रवाशांचा सवाल : रेल्वे प्रशासनाचा कानाडोळा, दखल केव्हा घेणार?
बाराभाटी : कोळशाच्या इंधनावर चालणारी आगगाडी या कालावधीपासून गोंदिया ते बल्लारशा मार्गावर रेल्वे धावत आहे. अनेक वर्षे...
more... लोटून गेली रेल्वेस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहे. कोरोनाकाळ संपताच रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या; पण रेल्वेस्थानकावर सोयीसुविधांच्या नावावर बोंब आहे. अनेक दिवसांपासून बाराभाटी रेल्वेस्थानक अंधारात आहे. येथील विद्युत खांबाचे लाइट खराब होऊन बंद पडले आहेत. याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना देऊनही त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
या रेल्वेस्थानकावर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या पुरता बोजवारा उडाला आहे. रेल्वेस्थानक परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे पण बंद पडलेले पथदिवे अद्यापही सुरू करण्यात आले नाहीत. परिणामी प्रवाशांना सायंकाळच्या वेळेस विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि रोजच्या रोजीरोटीसाठी जेवणाचा डबा घेऊन जाणारा मजूरवर्ग नेहमी प्रवास करतो. पथदिवे बंद असल्याने रेल्वेस्थानकावर गाडीतून उतरताना प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या रेल्वेस्थानकावरून सायंकाळच्या सुमारास दररोज दोन प्रवासी रेल्वेगाड्या, तर रात्री दोन प्रवासी रेल्वे धावतात. बाराभाटी रेल्वेस्थानकावरील विद्युत पथदिवे बंद असल्याने प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेल्वे अधिकारी लक्ष केव्हा देणार
बाराभाटी रेल्वेस्थानकावरील पथदिवे बऱ्याच महिन्यांपासून बंद आहे. याची माहिती नागभीड रेल्वे जंक्शन येथील विद्युत विभागात भ्रमणध्य नीद्वारे दिली आहे; पण याकडे लक्ष दिले नाही. नेहमीच कानाडोळा करीत असल्याची माहिती आहे.
परिसरात वाढला हिरवा कचरा
या रेल्वेस्थानकाच्या सभोवतालच्या परिसरात हिरवा कचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रवासी बसतात त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
click here