परभणी-मुदखेड रेल्वेमार्ग दुहेरीकरणास प्रारंभ
प्रवासी व ग्राहक सुलभीकरण पंधरवडा
नांदेड : रेल्वे व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांची माहिती
प्रवासी व ग्राहक सुलभीकरण पंधरवडा ■ शर्मा यांनी 'स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत' मोहिमेअंतर्गत रेल्वे प्रशासनाने २६ मे ते ९ जून या कालावधीत प्रवासी व ग्राहक सुलभीकरण पंधरवडा आयोजन केले आहे. यानिमित्त शुक्रवारी रेल्वेच्या सर्व अधिकार्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवून रेल्वेस्थानक परिसरात साफसफाई ठेवू तसेच प्रवाशांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहित...
more... करू, अशी शपथ घेतली. आदिलाबाद, नांदेड, पूर्णा आदी स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नांदेड : रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर परभणी-मुदखेड रेल्वे मार्ग दुहेरीकरणास प्रारंभ झाला. हे काम आगामी तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी शुक्रवारी येथे दिली.
नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने सुरू असलेल्या प्रवासी व ग्राहक सुलभीकरण पंधरवड्यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. शर्मा म्हणाले, रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पिंगळी स्थानकापासून सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात १५ कोटींचे काम होणार आहे. रेल्वेस्थानकावरील लूप लाईनवरून धावणार्या गाड्यांची गती पूर्वी प्रतितास १५ किलोमीटर होती. ती वाढवून दुप्पट केली असून सध्या गाडीची गती प्रतितास ३0 किलोमीटर आहे. मुदखेड-आदिलाबाद स्थानका दरम्यान गाड्यांची गती ताशी ८0 किलोमीटरवरून ९0 करण्यात आली. तर हिंगोली- अकोलादरम्यान, गाड्यांची गती प्रतितास १00 किलोमीटर केल्याचे शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे गाड्या निर्धारित वेळेत स्थानकावर पोहोचण्यास मदत होत आहे.
अकोला- अकोट या मार्गाच्या ब्रॉडगेजचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण केले जाईल. तसेच शेगाव व गंगाखेड स्थानकादम्यान येणार्या विविध स्थानकावर वेगवेगळ्या गाड्यांना थांबे देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात प्रस्ताव पाठविल्याचे ते म्हणाले. रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा आयुक्त मोहम्मद इश्तियाक म्हणाले, बासर येथून होत असलेल्या शिंदी तस्करीसंदर्भात चौकशी सुरू आहे. यासंदर्भात किनवट व अन्य स्थानकांवर आरपीएफचे कर्मचारी तपासणी करीत आहेत. वरिष्ठ डीएमओ विक्रमादित्य, नेहा रत्नाकर, राजकुमार वानखेडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)