वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वेच्या वाढीव खर्चास मंजुरी
नागपूरला स्मार्ट बनविण्यात फ्रान्सला स्वारस्य
मुख्यमंत्र्यांची माहिती : रेल्वे प्रकल्पांसाठी स्वतंत्र कंपनी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सर्व रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी स्वतंत्न कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे योजनेच्या अंदाजे ४७0 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली तसेच नागपूरला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी फ्रान्स सरकारने स्वारस्य दाखविले असल्याची माहिती मुख्यमंत्री...
more... देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
नक्षलग्रस्त भागातील रेल्वे प्रकल्प तत्काळ सुरू होण्यासाठी राज्य शासनाने जमीन अधिग्रहणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे प्रकल्पाचे काम येत्या मार्चपर्यंत सुरू करण्यासाठी विशेष
पान/९ नागपूरला स्मार्ट बनविण्यात फ्रान्सला स्वारस्य मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही भेट घेतली. या भेटीत मुंबई आर्थिक हब बनविण्यावर चर्चा झाली. यासाठी एक विशेष कृती दलाचे गठन होईल. नवी मुंबई विमानतळासंदर्भात येत्या मार्चपर्यंत एक वित्तीय प्रस्ताव केंद्रास सादर केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. नागपूरला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी फ्रान्स सरकारने स्वारस्य दाखविले असल्याचेही त्यांनी सांगितले. ■ नक्षलग्रस्त भागातील रेल्वे प्रकल्प तत्काळ सुरू होण्यासाठी राज्य शासनाने जमीन अधिग्रहणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे प्रकल्पाचे काम येत्या मार्चपर्यंत सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासद रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिले.