****** Central Railway Suburban(Mumbai) System Dekh Kar Chinese Railway wale bhi Hakka Bakka Ho gaye *****
********* Yaha Hum Central Railway ko Maintance ke bare me koste hai lekin Bahari desh Issi System Par Nazz karte hai********
***मुंबईचा लोकल पसारा पाहून चिनी अवाक....***
***मुंबई : ४५ लाख प्रवासी आणि त्यांची लोकलमधून होणारी वाहतूक याची माहिती घेतानाच प्रत्यक्षात उपनगरीय लोकल प्रवाशांची वर्दळ पाहणार्या चीनच्या शिष्टमंडळातील...
more... २२ जणांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली आणि केवढा हा पसारा, असे म्हणत रेल्वे प्रशासनाची पाठही थोपटली. चीनच्या रेल्वे आणि त्यांच्या अन्य विभागांतील वरिष्ठ अधिकार्यांचे एक शिष्टमंडळ मुंबई भेटीवर आले असून, त्यांनी बुधवारी मध्य रेल्वेला भेट दिली.
चीनचे २२ जणांचे शिष्टमंडळ सध्या १३ ते १७ जुलैपर्यंत भारत दौर्यावर आले आहे. हे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईत आले होते. या शिष्टमंडळात नॅशनल रेल्वे अँडमिनिस्ट्रेशनचे (एनआरए) उप प्रशासकीय अधिकारी झेंग झियान यांच्यासह चीनच्या वाहतूक विभागातील आणि पीपल रिपब्लिक ऑफ चायनाच्या एनआरएमधील अधिकार्यांचा समावेश होता. या वेळी त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम होते. दुपारी १२ वाजेपर्यंत शिष्टमंडळासोबत बैठक झाल्यानंतर त्यांना वर्ल्ड हेरिटेज असलेले आणि मुंबईतील सर्वात महत्त्वाचे वर्दळीचे असे सीएसटी स्थानक दाखवण्यात आले. या स्थानकाची पाहणी करतानाच त्यांनी लोकलमधून उतरणारा आणि स्थानकात येणार्या- जाणार्या प्रवाशांचा लोंढा बघितला. हे पाहताच चिनी शिष्टमंडळातील सदस्य अवाक् झाले.
***(प्रतिनिधी) प्रवाशांच्या संयमाचीही केली प्रशंसा ***
अवघ्या ११८ लोकल आणि १,६१८ फेर्यांमधून ४२ ते ४५ लाख प्रवासी वाहतूक नेहमी केली जात असल्याचे शिष्टमंडळाला रेल्वे अधिकार्यांनी सांगितले. हे ऐकताच त्यांनी रेल्वे अधिकार्यांची पाठ थोपटण्याबरोबरच प्रवाशांच्या संयमाचीही प्रशंसा केली. त्यांनी सीएसटी नियंत्रण कक्षाचीही पाहणी केली. या शिष्टमंडळाची रेल्वे अधिकार्यांसोबत बैठकही झाली.