खुशखबर ! बल्लारपूर-गोंदिया मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या सुरू
नागभीड : बल्लारपूर चांदाफोर्ट नागभीड-गोंदिया मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या असून नागभीड येथे जबलपूर सुपरफास्ट गाडीचा थांबा ही मंजूर झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात रेल्वेच्या या निर्णयाने प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
कोरोना...
more... काळात देशभरातील सर्वच रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र बल्लारपूर- चांदाफोर्ट- नागभीड- गोंदिया या मार्गावरील अपवाद वगळता पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
गडचिरोली चिमूरचे खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात द.पु.म. रेल्वे बिलासपूर झोनचे सदस्य संजय गजपुरे यांनी २ ऑगस्ट २०२२ ला नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दान यांना याबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती दिलेल्या आश्वासनानुसा १ ऑक्टोबरपासून या मार्गावरील सर्वच रेल्वे पॅसेंजर गाड्या पूर्वीप्रमाणेच नियमितपणे सुरू झाल्या आहेत.
यासोबतच नागभीड रेल्ट स्थानकावर या मार्गावर नव्यानेच सुरू झालेल्या जबलपूर-चांदाफोर्ट य सुपरफास्ट रेल्वे गाडीचा थांबा ही मंजूर करण्यात आला आहे.
भाडे अजूनही वाढलेलेच
अजूनही पॅसेंजर गाड्यांचे प्रवासी भाडे हे एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणेच आकारण्यात येत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये असंतोष आहे. वेळेची बचत होत असली तरीही आर्थिक ताण कमी न झाल्याने लवकरात लवकर पूर्ववत पॅसेंजर रेल्वे गाडीचे भाडे आकारण्यात यावे व प्रवाशांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी आहे.