'प्रेरणा एक्स्प्रेस' धावणार सुपरफास्ट!
अकोला
नागपूर ते अहमदाबाद दरम्यान धावणारी ११४५४ /११४५३ नागपूर-अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्स्प्रेस १५ जानेवारी २0१७ पासून सुपरफास्ट चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असून, नव्या वर्षात ही गाडी २२१३७/२२१३८ या क्रमांकाने सुपरफास्ट धावेल.
गुजरात राज्यात जाणार्या खास वैदर्भीय प्रवाशांस्या सुविधेकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने ११४५४/११४५३ नागपूर-अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्सप्रेस सुरू केली. सप्ताहातून तीनदा धावणार्या...
more... या गाडीला दोन्ही राज्यांतील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून या गाडीची सुटण्याची वेळ सकाळी ९.३५ आहे. त्यात बदल करण्यात आला असून, १ ऑक्टोबरपासून प्रेरणा एक्स्प्रेस सकाळी १0.३0 वाजता नागपूरवरून सुटेल व दुसर्या दिवशी पहाटे ४ वाजता अहमदाबादला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी सायंकाळी ५.२0 वाजता अहमदाबादवरून निघेल व दुसर्या दिवशी सकाळी १0.४0 वाजता नागपूरला पोहोचेल. १५ जानेवारी २0१७ पासून प्रेरणा एक्स्प्रेस २२१३७/२२१३८ या क्रमांकाने ओळखली जाणार असून, मार्गातील १४ रेल्वेस्थानकांवर थांबण्याचा कालावधी कमी करून तिला सुपरफास्ट चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील माहिती अधिकार्यांनी 'लोकमत'ला दिली.
नव्या वर्षात अकोला मार्गे जाणार्या आणखी काही गाड्या सुपरफास्ट चालविण्याचा विचार मध्य रेल्वे