New 11 stations will be constructed in addition to existing 13 stations:
१. नवीन पनवेल, २. टेंबोडे, ३. पिंधर, ४. निघू, ५. नारीवली, ६. नांदवली, ७. नवी डोंबिवली, ८. पिंपळस, ९. कलवार, १०. डुंगे, ११. पाये गाव.
पनवेल-विरार मार्गावर ११ नवीन स्थानके
वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येमुळे लोकलवर पडणारा ताण आणि प्रवाशांच्या मागण्या लक्षात घेत, येत्या काही वर्षांत नवीन रेल्वे स्थानकांची भर मुंबई उपनगरीय लोकल...
more... मार्गावर पडणार आहे. एमआरव्हीसीकडून पनवेल-वसई-विरार कॉरिडोर बांधला जाणार असून, या प्रकल्पांतर्गत ११ नवीन स्थानकांचा समावेश केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पांतर्गत नवी डोंबिवली स्थानकही उदयास येईल. सध्या प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे असल्याची माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली.
एमआरव्हीसीच्या ११ हजार कोटी किमतीच्या एमयूटीपी-३ ला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली. त्यामुळे यातील सर्व प्रकल्प येत्या पाच वर्षांत मार्गी लागू शकतात. या प्रकल्पांबरोबरच एमआरव्हीसीने पनवेल-वसई-विरार कॉरीडोर प्रकल्पही स्वतंत्रपणे मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. प्रकल्पात दोन नवीन लाइन येणार असून, त्यामुळे लोकल प्रवास सुकर होण्यास मदत मिळेल. ७0 किलोमीटर असलेल्या प्रकल्पाची किंमत तब्बल ९ हजार कोटी रुपये आहे. पनवेल-वसई-विरार कॉरीडोरमध्ये एकूण २४ स्थानके आहेत. यामध्ये सध्या याच मार्गावर असणाऱ्या १३ स्थानकांचा समावेश असेल. त्या व्यतिरिक्त आणखी नवीन ११ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब नवीन अकरा स्थानकांत नवीन पनवेल हे स्थानक येतानाच नवीन डोंबिवली स्थानकही उदयास येईल. या संदर्भात एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारले असता, सर्वात मोठा प्रकल्प असून, पाच वर्षांत त्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. रेल्वे बोर्ड, निती आयोगानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे अंतिम मंजुरीसाठी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अंतिम मंजुरीही लवकरच मिळेल. प्रकल्पात नवीन अकरा स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रस्तावित ११ स्थानके : १. नवीन पनवेल, २. टेंबोडे, ३. पिंधर, ४. निघू, ५. नारीवली, ६. नांदवली, ७. नवी डोंबिवली, ८. पिंपळस, ९. कलवार, १०. डुंगे, ११. पाये गाव.