पुणे जिल्हा
==============
तालुके १ जुन्नर २ आंबेगाव ३ खेड ४ मावळ ५ मुळशी ६ हवेली ७ वेल्हे ८ भोर ९ पुरंदर १० बारामती ११ इंदापूर १२ दौंड १३ शिरूर १४ पुणे शहर
==============
दळणवळण...
more...
पुणे-मुंबई हा सहा पदरी गतिमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले आहेत.
देशा्च्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थानके याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
१४ पैकी फक्त २ तालुके अशे आहेत जे रेलवे ने जोडले आहेत ,बाकि १२ च काय ???